सातपुडा जंगलात सर्रास वृक्षतोड मात्र वन अधिकारी स्वस्थ..

0
13

हेमकांत गायकवाड

 

चोपडा : सातपुडा जंगलात सर्रास वृक्षतोड मात्र वन अधिकारी स्वस्थ… वर्डी ग्रामस्थांची कारवाई करण्याची मागणी..महाराष्ट्र शासन दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवत असते महाराष्ट्र शासनाच्या जास्तीत जास्त वृक्ष लागवडीकडे कल असतानाही जे वृक्ष आज डोलदार झाले आहेत त्यांच्याकडे मात्र शासनासह व वन कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्ष असल्यामुळे सातपुडा जंगल आज बोडका होत आहे याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग असल्यास परिसरात बोलले जात आहे.वर्डी जवळ राम तलाव परिसरात फॉरेस्ट गट नंबर 198 कंपार्टमेंट मध्ये आज काही आदिवासींनी 35 सागवान वृक्षांची तोड करत असताना त्यांना वर्डी चे माजीउपसरपंच सचिन डाभे व शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांनी हटकले असता त्यांनी तिथून पळ काढला येथील तोडलेले वृक्ष पाहून मनात खूप खंत वाटली ज्या वृक्षांच्या वाढीसाठी वीस वर्षे लागतात वृक्षांना यांनी वीस मिनिटात तोडून टाकलं संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या घटनेची दखल घेऊन वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजीउपसरपंच सचिन डाभे व शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील, विनोद धनगर वर्डी, गुलाब पाटील यांच्यासह वर्डीच्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Spread the love