‘लेखक-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला राज्यभरातील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवारीदेखील 200 हून अधिक शो हाऊसफुल्ल झाले. प्रतापगड! नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर उभी राहते महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा! ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राने दिलेले एक अजोड देणे! तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीन-चारपटीने बलाढय़ असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून छत्रपती शिवरायांनी मोठय़ा कौशल्याने प्रचंड विजय मिळविला. हाच देदीप्यमान इतिहास या चित्रपटातून अनुभवायला मिळत आहे.