जळगावात घरफोडी करणारे अज्ञात चोरट्यांना काही तासांतच स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचेकडुन अटक

0
35

जळगाव संदेश

जळगाव- :शहरात काही दिवसांपासुन घरफोडी चोरी चे प्रमाण वाढल्याने गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणे बाबत मा. पोलीस अधीक्षक सो डॉ. श्री प्रविण मुंडे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री चंद्रकात गवळी मा. सहा पोलीस अधीक्षक सो श्री कुमार चिंता अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार मा. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्य माहिती नुसार एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुरनं २८८/२०२२ भा.द.वि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा हा एमआयडीसी पोस्ट हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर हनीफ काकर रा. बिसमील्ला चौक तांबापुर जळगाव याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यानी स्था. गु.शा कडील पोलीस उप निरीक्षक श्री अमोल देवडेपोहेकॉ,विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, पोना,नितीन बाविस्कर, किरण धनगर,प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील चापोकॉ, प्रमोद ठाकुर अशांना सदर आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेश दिल्याने सदर पथकाने आरोपीताचा शोध घेत असतांना सदर आरोपी हा जळगाव शहरीतील बिसमील्ला चौक तांबापुरा परीसरांत फिरत असल्याची बातमी पथकांस मिळाल्याने सदर पथकाने ताबांपुरा बिसमील्ला चौक भागात समीर हनीफ काकर वय – २० वर्ष रा. तांबापुरा व त्याचा साथीदार अन्सार शहा रूबाब शहा वय १९ रा. मच्छीबाजार तांबापुर जळगाव हे मिळुन आल्याने तेव्हा त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस करता तेव्हा त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांचे मदतीने केला असल्याचे कबुल केल्याने आरोपी नामे १) समीर हनीफ काकर वय २० वर्ष रा. तांबापुरा जळगांव २) अन्सार शहा रूबाब शहा वय १९ रा. मच्छीबाजार तांबापुर जळगाव यांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांचे ताब्यात दिले आहे.

Spread the love