यावल : तालुक्यातील नायगावातील येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच तरुणाने अपहरण केले. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नायगाव 17 वर्षीय पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिने नुकतेच इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती व गावातीलच संशयीत भूषण आत्माराम कोळी हा नेहमी त्रास द्यायचा मात्र पोलिसात तक्रार दिली नव्हती.
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
मंगळवारी रात्री कुटुंबातील सदस्य झोपले असताना अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली व गावातील भूषण कोळी यानेच काहीतरी दम देवून अज्ञात उदेशाने तिचे अपहरण केल्याचा संशय असल्याची तक्रार यावल पोलिसात दिल्यानंतर संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.