यावल प्रतिनिधी प्रविण मेघे
यावल : तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तरूणाने अपहरण केले व तिला आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने नासिक येथे घेवून गेला आणी आपल्या नातेवाईक दाम्पत्याच्या घरी तिच्यावर लैगीक अत्याचार केला तेव्हा चार दिवसात सदर पिडीता घरी परतली व रविवारी दिनांक १ मे रोजी चार जणांविरूध्द बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय तरूणीचे दिनांक २७ एप्रिल २०२२ रोजी पहाटे गावातील तरूण चंद्रकांत उर्फ भुषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने महेंद्र कोळी आसोदा ता.जळगाव याच्या मदतीने अपहरण केले व त्या अल्पवयीन मुलीस नासिक येथील नातेवाईक दिपाली जितेंद्र कोळी व जितेंद्र कोळी यांच्या घरी घेवुन गेला आणी ठिकाणी मुलीवर लैगीक अत्याचार केले चार दिवस अल्पवयीन नासिकला होती व रविवारी ती घरी परतली आणी घडलेली घटना कुटुंबास सांगीतली तर या पुर्वी या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा यावल पोलिसात दाखल होता तेव्हा अल्पवयीन मुलगी घरी पतल्याचे समजताच पोलिसांनी अल्पवयीन व चंद्रकांत उर्फ भुषण सोनवणे (कोळी) याच्या ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीचे महेंद्र कोळी आसोदा ता. जळगाव याच्या मदतीने अपहरण केले व नासिकच्या जितेंद्र व दिपाली कोळी या दाम्पत्याच्या घरी लैगीक अत्याचार केला म्हणुन चौघांविरूध्द यावल पोलिसात बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व उर्फ भुषण सोनवणे (कोळी) यास अटक करण्यात आली आहे तर इतर तीघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे पुढील तपास यावलचे पोलिस निरिक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.