यावल शहरातील सुव्यवस्थे करीता बैठक संपन्न

0
8

यावल प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल : शहरातील कायदा व सुव्यवस्थे करीता सर्वधर्मियांचे योगदान आहे. शहरात जातीय सलोखा असुन असाच सलोखा कायम ठेवावा आणी तरूणांनी सोशल नेटवर्कच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या हातुन अफवा पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले ते यावलला शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

सोशल नेटवर्कच्या माध्यमातुन सण,उत्सवा दरम्यान पसरणाऱ्या अफवा आणी शहरातील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम शांततेत व्हावा म्हणुन येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत फैजपूरचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी सर्वधर्मिय बांधवांना मार्गदर्शन केले यात शहरातील जातीय सलोख्याचे पोलिसांनी कौतुक केले मात्र, सोशल नेटवर्कवर सध्यरा अफवा खुपचं पसरतात त्यांच्यापासुन तरूणांनी सावध रहावे कुढल्याही प्रकारे धार्मिक भावना दुखवणारे पोस्ट फारवर्ड करू नये. शहरात असलेला सलोखा या मुळे शहरात कायदा व सुव्यवस्था कायम आहे व ती पुढे देखील कायम ठेवावी आणी जातीय सलोखा कायम ठेवावा असे अवाहन या बैठकीत करण्यात आले या बैठकीत हाजी शब्बीर खान, माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे, गोपालसिंग पाटील, डॉ. निलेश गडे, सईद शाह, शेख याकुब, शेख हबीब, उमेश फेगडे, सुनिल जोशी, विजय पंडीत, गुलाम रसुल दस्तगीर, शरद कोळी, शेख जाकीर, प्रा. मुकेश येवले, अमोल भिरूड, जगदिश कवडीवाले, राजेश श्रावगी, विनोद बयाणी, मुरलीधर बारी, सुनिल पुजारी, गोपाल चौधरी सह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

ध्वनीक्षेप करीत अर्ज करा.

तालुक्यातील मंदिर व मस्जिदीवर असलेल्या ध्वनीक्षेप, भोंगे संर्दभात त्या त्या धार्मिकस्थळाच्या प्रमुखांनी पोलिस ठाण्यात अर्ज करावा तसेच पोलिस ठाण्यातील छापील अर्जात माहिती भरून द्यावी असे अवाहन पोलिस निरिक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी केले आहे.

Spread the love