वर्ल्ड मराठा आँगनायझेयशन तर्फे भव्य रक्तदान शिबीर. 

0
17

हेमकांत गायकवाड

चोपडा : वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर.वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे संपूर्ण राज्यभरात ७२ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन रावेर येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील ,जळगाव येथील दर्जी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा.गोपाल दर्जी(पाटील), डॉ.रवींद्र भास्कर पाटील, डॉ. आनंद पाटील, डॉ. हेमंत पाटील, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, डॉ.व्ही.टी.पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. अजय करंदीकर, दिनेश बोरसे, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. भूषण सोनवणे, डॉ. सूशील सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Spread the love