ग्रामसेवक मजीत तडवी व त्यांच्या कुटूंबियांचा पत्रकारांवर  हल्ला : ग्रामसेवक मजीत तडवी सह कुटुंबातील व्यक्ती वर गुन्हा दाखल

0
16

यावल : तालुक्यातील परसाळे येथे दैनिक खान्देश विश्ववेध चे मुख्य कार्यकारी संपादक तथा स्पीड न्यूज महाराष्ट्र चे ब्युरो चीफ अशोराज तायडे हे आपल्या टीम सोबत वृत्त संकलनासाठी गेले असता.राज्यात वीज टंचाई असताना मात्र परसाडे ग्रामपंचायत कार्यालयातील वहृयाड्यात भर दिवसा लाईट सुरू असल्याचे त्याना दिसले त्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या लाईटचे चित्रीकरण करून तेथील बसलेल्या नागरिकांना प्रतिक्रिया विचारल्यात मात्र नागरिकांनी कॅमेरा समोर बोलणे टाळले, त्यानंतर टीमने गावात जाऊन गावातील समस्या जाणून घेतल्या असता गावातील घरकुलांमध्ये मध्ये परसाडे येथील ग्रामसेवक मजीत तडवी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.तर तडवी हे प्रत्येक घरकुल मंजूर करण्यासाठी संमधीत लाभार्थ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये घेत असल्याचे सांगितले व त्यातील काही रक्कम हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागत असल्याचे तडवी हे सांगत असल्याचे सांगितले मग हे वरिष्ठ कोण असा प्रश्न सुज्ञ नागरीकांनी मध्ये उपस्थित होत आहे.त्यांनतर पांढरी वस्तीतील उपस्थित महिलांनी ग्रामसेवक मजीत तडवी कशा प्रकारे नागरिकांकडून पैसे घेतात,त्याच्या विरुद्ध कुणी तक्रार दिली तर ते कशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करतात , कुणी त्याच्या चुकीच्या कार्यपद्धती बद्दल प्रश्न निर्माण केलेत तर ते कसे परिवारासह समोरच्याना मारहाण करून दडपशाही करतात असे सांगत असताना. ग्रामसेवक मजीत तडवी,अजित तडवी,राजू तडवी,अरमान तडवी,रहीमत तडवी,नजमा तडवी हे पत्रकार व मुलाखत देणार्याच्या अंगावर धावून येत लाढ्या काठ्यांनी मारू लागले यात अशोराज तायडे यांच्या डाव्या हाताला इजा झाली तर,कॅमेरामेन अमित तडवी यांच्या हातातील कॅमेरा ची तोड फोड करीत मेमरिकार्ड काढत त्यांना ही मारहाण केली तसेच यासिन तडवी व इब्राहिम तडवी यांना ही मारहाण करून गँभीर जखमी केले. सद्या त्याच्यावर जळगांव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अशोराज तायडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशन ला ग्रामसेवक मजीत तडवी व त्यांच्या सोबत असलेल अजित तडवी,राजू तडवी,अरमान तडवी,रहीमत तडवी,नजमा तडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक आय.पी.एस. आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोलपकर हे करीत आहेत.

Spread the love