ममुराबाद येथे 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

0
33

प्रतिनीधी अमर पाटील

तरुणाने शेतातीलच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली.

▪️शेतातच झाडाला घेतला गळफास

▪️वैजनाथ येथे तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

▪️परिसरात व्यक्त केली जात आहे हळहळ

ममुराबाद -: ट्रक्टरवर कामाला जातोय असं सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाने गावाशेजारीच असलेल्या एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राजु दशरथ भिल(वय-27) असं मृत तरुणाचं नाव आहे. तीन चार दिवसापासुन त्याची तब्बेत बरी नसल्यामुळे आजाराला कंटाळुन सदर तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे राजु दशरथ मालचे हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास होता राजु हा घरी वडिलांना कामात मदत करत होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास राजु हा ट्रॅक्टरवर कामाला जातो असे सांगुन निघाला परंतु गावाशेजारीच हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात राजुने झाडाला गळफास घेतल्याचे शेतकरी चंद्रकांत पाटील यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती त्याच्या घरच्यांना म्हणजेच मृत राजुच्या वडिलांना दिली.

घटनास्थळी धाव घेत वडिलांनी राजुचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला.                        राजुच्या पश्‍चात आई, वडील, मोठा भाऊ, असा परिवार आहे.

घटना स्थळी तालुका पोलीस स्टेशनचे साहेबराव पाटील, माणिक सपकाळे, तसेच पोलीस पाटील यांनी राजूचा मृतदेह झाडावरून खाली उतरवुन शवविच्छेदनासाठी पाठवीला आहे. पुढील तपास माणिक सपकाळे करित आहे.गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Spread the love