राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, काय आहे कारण ?

0
14

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

नेमकं कारण काय ?

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे.राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. मात्र उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला प्रचंड विरोध करण्यात आला. तरीदेखील राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते.

Spread the love