ममुराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंतग चिन्हावर लढलेल्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय…

0
33

महेंद्र सोनवणे

जळगाव -तालुक्यातील ममुराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंतग चिन्हावर लढलेल्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

ममुराबाद विकास सोसायटीत अत्यंत खिलाडू वृत्तीने झालेल्या या निवडणुकीत मतदार सदस्यांनी शेतकरी पॅनलचा व शेतकरी विकास तिसरी आघाडी पॅनलचा पराभव करीत शेतकरी विकास पॅनलला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ममुराबाद विकास सोसायटीत 13 जागांसाठी दि. 22 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

हेमंत चौधरी, अशोक गावंडे, अनिल पाटील, बाळकृष्ण पाटील, या पॅनल प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास गटाने विजयश्री खेचून आणली. सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत साधेपणाने आपला विजयोत्सव साजरा केला.

ममुराबाद विकास सोसायटीतील नवनिर्वाचित उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे –

सर्वसाधारण मतदारसंघ–

आधार भालचंद्र शिदे ( 244)

अशोक विश्वनाथ गांवडे ( 236 )

गणेश रमेश पाटील ( 233)

अनिल वसंत पाटील ( 231 )

शरद अंकुश पाटील ( 228 )

बाळकृष्ण सखाराम पाटील(227 )

भास्कर नारायण ढाके ( 223 )

शालीक चावदस चौधरी ( 206 )

इतर मागास वर्ग मतदार संघ–

हेमंत गोविंदा चौधरी ( 310)

विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ –

नारायण पुना धनगर(285)

महिला राखीव मतदार संघ –

साधना सुनिल चौधरी (281)

अश्वीनी शरद पाटील (230)

अनुसूचित जाती जमाती मतदार संघ –

भानुदास देविदास सोनवणे (267 )

एकूण 578 मतदार सभासद संख्या असलेल्या विकास सोसायटी 515 सदस्यांनी मतदान केले. दिपक पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Spread the love