जळगाव – पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांनी जनतेसाठी 8 वर्षे सेवा सुशासन व गरीब कल्याण योजना राबविल्या
या अभियानाअंतर्गत भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा च्या वतीने दि. ४ जुन २०२२ शनिवार रोजी भाजपा कार्यालय बळीराम पेठ जळगाव येथे सायंकाळी भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार मा. राजु मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष मा. दिपक भाऊ सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला . सर्व प्रथम रामायणकार महर्षी वाल्मिकी शहिद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात झाली
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सुर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भाऊ सोनवणे आदिवासी नेते बाळासाहेब सैदाणे भाजपा जळगाव ग्रामीण अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन भाऊ बाविस्कर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद भाऊ सपकाळे जेष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष माधवराव कुळकर्णी माजी नगरसेवक विजय वाडकर होते
हा मेळावा भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी आयोजित केला होता
या मेळाव्यात ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी, अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस जगदीश सोनवणे , युवराज सपकाळे महिला प्रमुख आशा ताई सपकाळे रजनी ताई सोनवणे उपाध्यक्ष योगेश्वर कोळी , गुलाब सपकाळे , संतोष तायडे, चिटणीस गंभीर तडवी, दिव्यांग विकास आघाडी अध्यक्ष गणेश वाणी, योगेश गवळी, सतीश तायडे, निखिल सोनवणे, राहुल गुरव , राजेंद्र कोळी, रविंद्र कोळी, विजय नन्नवरे, विनोद तायडे, हेमंत निकम, पद्माकर पाटील, ताराचंद पाटील, बापू शिंदे समाधान सपकाळे, विशाल कुमावत, सुनील जाधव, कैलास सोनवणे, निलेश सोनार, अशोक सोनवणे, यांच्या सह आदिवासी अनुसूचित जमाती चे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
या मेळाव्यात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी , जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सोनवणे, बाळासाहेब सैदाणे, प्रल्हाद सोनवणे यांनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आदिवासी अनुसूचित जमातींसाठी त्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनां विषयी माहिती देवून मार्गदर्शन केले
यावेळी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी १५ नोव्हेंबर रोजी शहिद बिरसा मुंडा यांची जयंती गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले त्या बद्दल अनुसूचित जमाती च्या वतीने भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब यांचे अभिनंदन केले
या मेळाव्याचे आयोजन व प्रास्ताविक प्रल्हाद सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन सरचिटणीस जगदीश सोनवणे यांनी केले मेळाव्याला उपस्थित मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचें आभार उपाध्यक्ष योगेश्वर कोळी यांनी मानले
भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा
प्रल्हाद सोनवणे
मो नं. 8421711919