गोरगावले बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश

0
32

चोपडा प्रतिनिधी -जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तालुक्यातील गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील खडगाव, घुमावल बुद्रुक, घुमावल खुर्द, गोरगांवले खुर्द, खेडी-भोकरी, वडगावसिम, कोळंबा इत्यादी गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बससेवा बंदमुळे गैरसोय होत होती.एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप तद्नंतर गोरगावले बुद्रुक येथे नवीन रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे बससेवा बंदच होती.येथील रस्ता कॉंक्रिटचे काम पूर्ण झाले परंतु संबंधित विभागाकडून तसे पत्र मिळाले नव्हते.याबाबत गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी चोपडा आगारप्रमुख संदेश क्षिरसागर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गोरगावलेची बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते.त्यानुसार नुकतीच चोपडा येथून गोरगावले,खेडीभोकरी बससेवा सुरू करण्यात आली.यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थं, शालेय विद्यार्थी व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बससेवा सुरू करण्यास रस्ता दुरुस्तीची अडचण होती.

आधीच एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप तद्नंतर गोरगावले येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बससेवा सुरू करण्यास अडचण येत होती.माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी अनेकदा याबाबत विनंतीही केली. तसेच संबंधित विभागाकडुन परवानगीही मिळाली.त्यानुसार नुकतीच बससेवा सुरू करण्यात आली आहे.याबाबत प्रवाशांनी एस.टी.महामंडळास सहकार्य करावे.

संदेश क्षीरसागर डेपो मॅनेजर, एसटी डेपो चोपडा

Spread the love