मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. आपल्याला आकड्यांचा खेळ खेळायचा नाही, असे स्पष्ट करत आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. आपल्याच माणूस नाराज असल्याचे आपल्याला चालणार नाही. आपल्याला सत्तेचा मोह नाही. मागच्या आठवड्यात आपण वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये गेलो. आता आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देत असल्याचे स्पष्ट केले.
सरकार म्हणून आपण अनेक कामे केली. बळीराजाला कर्जमुक्त केले. मला समाधान आहे की, आयुष्य सार्थकी लागले, औरंगाबादचे संभाजीनगर असे आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण आज झाले. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार, सोनिया गांधी यांचे आपण आभआर मानतो. त्याचप्रमाणे सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांनाही धन्यवाद देतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील मुद्दे
🏹आतापर्यंतची वाटचाल तुमच्या पाठिंब्याने चांगल्याप्रकारे केली आहे.
🏹आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे.
🏹आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव केले आहेत.
🏹नामांतरासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
🏹या बैठकीला फक्त काही मंत्रीच उपस्थित होते.
🏹या निर्णयाला काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी विरोध केला नाही. ते सोबत होते.
🏹शिवसेना काय आहे, हे आपण लहानपणापासून अनुभवत आहोत.
🏹शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोठे केले.
🏹मोठे झाल्यावर ते शिवसेनेला विसरले.
🏹सर्व शिवसैनिक आपल्यासोबत आहेत.
🏹आपण ज्यांना भरभरून दिले, ते नाराज आणि सामान्य शिवसैनिक आपल्यासोबत आहेत
🏹आजपर्यंतचे अनेक हल्ले शिवसेनेने परतवून लावले आहेत.
🏹न्यायदेवतेने दिलेला निकाल आपल्याला मान्य केला पाहिजे.
🏹राज्यपालांनी दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
🏹राज्यपालांनी पत्र मिळाल्यावर 24 तासात त्यावर कार्यवाही केली.
🏹आपल्याच काही लोकांची महाविकास आघाडीवर आक्षेप असेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, असे काँग्रेसने सांगितले
🏹आपण त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे
🏹मनात काय आहे, ते समोर येऊन सांगा
🏹आपल्याच शिवसैनिकांशी वाद आणि लढाया किती करायच्या
🏹आता केंद्राकडून मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे
🏹ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाच्या गुलाल उधळला, त्यांच्या रक्ताने तुम्ही रस्ते भिजवणार का
🏹उद्या त्यांना मुंबईत येऊ द्या, लोकशाहीचा पाळणा हलणार आहे.
🏹शिवसैनिकांनी त्यांचा मार्ग अडवू नये
🏹माझ्याविरोधात माझाच माणूस आहे, हे लाजिरवाणे आहे
🏹लोकशाहीत डोक्याता वापर फक्त मोजण्यासाठी होतो
🏹आपल्याला हा आकडेवारीचा खेळ खेळायचा नाही
🏹शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना मोठे केले, त्यांच्या पुत्रालाच ते सत्तेवरून खाली खेचत आहेत.
🏹आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, हीच आपली चूक झाली.
🏹आपल्याला सत्तेचा मोह नाही
🏹जनतेच्या समोर आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहेत.
🏹आपल्याला तुमचे प्रेम हवे
🏹आपल्याला शिवसेना पुन्हा नव्याने उभी करायची आहे.
🏹मी मुख्यमंत्रीपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे
🏹आपण अनपेक्षित पदावर आलो होतो, पदही अनपेक्षितपणाने सोडत आहे.
🏹शिवसेना आपलीच आहे, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांना जनतेपासून कोणीही दूर करू शकत नाही
🏹मी पुन्हा येईल असे म्हणालो नव्हतो, तरी मला यावे लागले, जिथे जायचे नव्हते, तिथे जावे लागले
🏹आता मी जनतेचा आहे, शिवसेना भवनात बसून पुन्हा पक्षाच्या बळकटीचे आणि जनतेचे काम करणार आहे