मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी बैठक बोलावली होती मात्र बैठकीला केवळ १०-१२ खासदारांची उपस्थिती असून १० खासदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र या बैठकीला लोकसभेच्या १० खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.