दारूड्यांना सुद्धा नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे.शिवराम पाटील

0
49

जळगाव – :दहीहंडीचे गोविंदांना नोकरीत पांच टक्के आरक्षण देणे म्हणजे मनाचा खूप मोठेपणा आहे.कोणतीही शैक्षणिक पात्रता नसतांना नोकरी देणे म्हणजे वसुधा एवम कुटुंबकम.असा आदेश काढणारे ठाण्यातूनच असले पाहिजे.येथे मुंबई,पुणे, नागपूर, नांदेड, बारामती सुद्धा कमी पडले.आम्ही पांचवीत असतांना गुरूजी शिकवत कि ,भारतातील वेड्यांचे इस्पितळ फक्त ठाणे येथे आहे.इस्पितळ म्हणजे दवाखाना किंवा रूग्णालय नाही,वेगळेच काहीतरी ठिकाण असावे.कोणी थोढा वेडेपणा केला कि,सल्ला देत असत.याला ठाण्याला पाठवावे लागेल.त्याचा अर्थ आता समजला.

जर गोविंदांना नोकरी देत असाल तर आम्ही दारूड्यांना सुद्धा नोकरीत आरक्षण पाहिजे.अशी मागणी करायला हरकत नाही.गोविंदांपेक्षा सरकारी नोकरीत, सरकारी तिजोरीवर आमचा जास्त हक्क आहे.आम्ही जास्त ईफेक्टीव्ह आहोत.आता ही काही तुरळक दारूडे ,बेवडे सरकारी नोकरीत आहेतच.पण ते परीक्षा पास होऊन.ते त्यांची गुणवत्ता झाली.पण विना गुणवत्ता नोकरी मिळवणे म्हणजेच आरक्षण.ते आम्हाला सुद्धा मिळालेच पाहिजे.देशाच्या कल्याण व सत्यानाश करण्यात आमचाही हातभार लागू शकतो.

जो रोज घेतो, जेवण करतो आणि पडून राहातो, त्याला दारूड्या म्हणतात.जो पितो,जेवण करीत नाही आणि बडबडतो त्याला बेवडा म्हणतात.बेवडा शब्द थोडा प्रेम,आदर, सन्मान देणारा आहे.त्यात त्याग सुद्धा आहे.अन्नधान्याची बचत ही होते.बायकोला स्वयंपाकाची चिंता राहात नाही.

कुटुंबातील आई,बाप किंवा बायको यांची कुठेतरी घसरण झाली कि आम्हाला अतिव दुःख होते.ते आम्ही चारचौघात सांगू शकत नाही.पण विसरताही येत नाही.सेन्सेटीव्हीटी जास्त असल्याने असे होते.घेतली कि आमचे विश्व बदलते.ऐहिक, कौटुंबिक, सामाजिक जिवन सोडून स्वर्गीय जिवनात जातो.साधारण बुद्धी चे लोक तरीही नरक समजतात.आमचा तिरस्कार करतात.घसरलेल्याचा तिरस्कार न करता तिरस्कार करणाऱ्याचा तिरस्कार करतात.

बेवड्यांचे आयक्यू,सेन्सेटीव्हिटी,मेरीट खूप वरचे असते.म्हणून आजपर्यंत आई वडील किंवा बायकोने कधीच त्याग केला नाही.आम्ही त्यांचा त्याग करून प्रयाग ला जाईपर्यंत.कारण आहे.कितीही घेतली असली तरी म्हणतो,माझी आई गंगा भागिरथी आहे.सात जन्मात अशी आई कोणाला लाभणार नाही.म्हणून ती कितीही थकली भागली असली तरीही मानगूट धरून घरात घेते.हातपाय तोंड पुसते.माझी बायको सती सावित्री आहे ,असे म्हटले कि,ती तंगडी धरुन सरपटत ओट्यावर ओढते.अंगावर गोणपाट टाकते. भाग्यवान आहोतच. कोणी चारचौघात आम्हाला शहाणपण शिकवू लागले तर बायको म्हणते,त्यांना सवय नाही पण हे जोडीदार जास्त करून टाकतात.

कोणताही दारूड्या किंवा बेवड्याला आजपर्यंत साप,विंचू,कुत्रा चावल्याची बातमी आली नाही.विषारी प्राणी सुद्धा जिवापाड प्रेम करतात.तर मग, मुख्यमंत्र्यांनी का करू नये? सरकार मधे फुकट पगाराची नोकरी का देऊ नये?

काही दारूडे,बेवडे आजही नोकरीत आहेत.कितीही मोठे काम केले तरी फक्त अकरा रूपये घेत होतो.आता जीएसटी लागल्याने पंचावन्न रूपये घेतो.साठ दिले तरी पांच परत करतो.कारण आहे, आम्हाला संत्रा, मोसंबी,टैंगो,कुत्ता पुरतेच पैसे हवे असतात.याला संयम म्हणतात.लांच किंवा घूस म्हणू नये.उलट सरकारने जी आर काढला पाहिजे कि, कोणत्याही सरकारी नोकराने पंचावन्न रूपये इल्लीगल ग्रैटीफिकेशन स्विकारले तर अण्टीकरप्शन च्या अधिकार क्षेत्रात येत नाही.

सरकारी नोकरीत येण्यासाठी परीक्षा बंद केल्या पाहिजे.कारण सरकार सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करीत आहे.त्याआधी सरकार तोट्यात आहे,हे दाखवणे आवश्यक आहे.तसे करण्यासाठी शंभर टक्के आरक्षण करणे आवश्यक आहे.एससीएसटी साठी एकवीस, महिलांसाठी पन्नास,ओबीसी साठी सत्तावीस,मराठा साठी तेरा, मुसलमानांसाठी सहा,अपंग,परितक्त्या, आत्महत्याग्रस्त, धरणग्रस्त,एक्स सर्व्हिसमन,आता गोविंदा, आम्ही बेवडे असे दोनशे टक्के आरक्षण जाहीर केले पाहिजे.वीकर सेक्शन ला अपग्रेड करणे आवश्यक असेल तर देश खड्ड्यात गेला तरी चालेल.आम्ही तर आधीच खड्ड्यात पडून असतो.म्हणून देशाचा सत्यानाश करण्यात आमचाही सिंहाचा वाटा असला पाहिजे.स्वातंत्र्यदिनी आम्ही सुद्धा रात्री दहापर्यंत झेंडा लावला होता.स्वत: गटारीत पडलो पण झेंडा हातचा सोडला नाही.हा आमचा राष्ट्राभिमान नाही का?ही आमची देशभक्ती नाही का? प्रत्यक्षात इंग्रजांविरोधात लढून मरणाऱ्यांपेक्षा ही देशभक्ती मोठी नाही का?

महाराष्ट्र विधानमंडळात अर्धे आधिक आमदार दारू उत्पादक आहेत.बाकीचे विक्रेते आहेत.त्यांच्या या पवित्र व्यवसायात आमचा सिंहाचा वाटा आहे.आम्ही रिचवतो,खपवतो.म्हणून पैसा मिळतो.तोच पैसा निवडणुकीत वापरून आमदार होतात.तर तितके दाक्षिण्य ठेवून आमदारांनी आमची बाजू विधानसभेत मांडली पाहिजे.ऋणउतराई केली पाहिजे.कर्म धर्म संयोगाने मुख्यमंत्री ठाणेतून मिळाले आहेत,तर आम्ही दारूडे,बेवड्यांना किमान पंचवीस टक्के आरक्षण मिळाले पाहिजे.ग्रामीण भागात तसेच शहरातील झोपडपट्टी भागात आमच्या सदस्यांची संख्या जास्त आहे.वीकर सेक्शन ला त्यानिमित्ताने सरकार मधे स्थान मिळण्याचा हा संविधानिक मार्ग आहे.

या व्यवसायात लक्ष्मी सुद्धा प्रसन्न असते‌.फार कमी काळात माणूस करोडपती होतो.विजय मल्याने हे उदाहरण घालून दिले आहे.देशाला सर्वाधिक टैक्स देणारा पदार्थ आम्ही रिचवतो.असाही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आमचा हातभार देशाची तिजोरी भरण्यासाठी लागतो. प्रधानमंत्रीचा देशविदेशातील खर्च ,विमानाचा इंधनखर्च आम्ही पुरवतो.दारू विकणारा माणूस फक्त आमदार नव्हे विमानकंपनी सुद्धा चालवू शकतो.शेतात जाण्यासाठी भारतीय लोक विमान वापरतील,असा मल्याचा मनसुबा सरकारने हाणून पाडला.काही काळ कि असेना पण आमचा घसा कोरडा पडला होता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या.माणूस अधीर झाला कि बधीर होण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.तसेच आमचे दारुड्या,बेवड्यांचे पुनर्वसन करणे,उच्चाटन करणे,सरकारमधे नोकरी देणे,समाजात मानाचे स्थान मिळणे,हाच तर हेतू आहे.मुख्यमंत्री आणि आमचा एकच उद्देश आहे.तो सफळ व्हावा.हि ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

शिवराम पाटील ९२७०९६३१२२                          महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.

Spread the love