जळगाव – तालुक्यातील ममुराबाद गावी विज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून या भागातील वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याकडे संबंधित वायरमन दुर्लक्ष करीत असल्याने कुणी कायम वायरमन देता का? असे म्हणण्याची वेळ या परिसरातील गावकऱ्यांवर आली आहे.
गावास स्वतंत्र पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. मात्र संबंधित कर्मचारी स्वतःच्या सोयीसाठी ममुराबाद गावी न राहाता आपल्या गावी राहुन ये जा करत असतात . किरकोळ स्वरुपाची कामे करत असतांना देखील लाईट तासंनतास बंद करूण ठेवतास. परिसरातील विज वारंवार खंडित राहण्याचे प्रकार होत असतात. यामुळे या परिसरातील, दुकान व्यवसायिक तसेच गावातील नागरीकांचे मोठे नुकसान होत आहे. विजवितरणच्या अधिकाऱ्यांना कसलेही सोयरसूतक वाटत नाही. याबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित वायरमन आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी वीज बंद करण्याबाबत कोणत्याच प्रकारची पुर्व परवानगी न घेता तासंनतास लाईट बंद करूण ठेवतात.गावातील नागरिकांनी बऱ्याच वेळेस तक्रारी करून देखील वरिष्ठ अधिकारी या गोष्टींपासून खरोखर अनभिज्ञ आहे.व आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. कामात कुचराई करणाऱ्या संबंधितास अधिकाऱ्यांनी समज द्यावी, व रात्रिच्या वेळी दोन तीन कर्मच्यारी गावी ठेवावे अशी मागणी गावकरी तसेच लहान-मोठे व्यापारी करीत आहेत.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुकानदारांचे फ्रिजमधील दुग्धजन्य पदार्थ खराब होऊन हजारो रुपयांचे नुकसान होत असून याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना गावी राहाण्याच्या सुचना द्यावा, अशीही मागणी जोर धरीत आहे.