राष्ट्रीय पोषण माह निमित्त पोषण दिन साजरा…

0
18

मुंजलवाडी प्रतिनिधी:-चंद्रकांत वैदकर

मुंजलवाडी -दि.१७ कृषी विज्ञान केंद्र, पाल (जळगांव-१) व इफको लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महा या उपक्रमांतर्गत पोषण महा अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माननीय डॉक्टर अरुणाताई चौधरी( प्राचार्य, आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगाव) कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवर व उपस्थित महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच परसबाग निर्मिती करिता भाजीपाला बियाणे किट चे वाटप करण्यात आले व तांत्रिक चर्चासत्रात डॉक्टर धीरज नेहेते (शास्त्रज्ञ ) यांनी परसबाग उभारणी बाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महिला व बालविकास अधिकारी कार्यालय रावेर येथील श्रीमती. हर्षदा चौधरी यांनी महिला पोषण याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महेश महाजन (प्र.वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल) यांनी केले. त्याचप्रमाणे श्री केशव शिंदे क्षेत्रीय अधिकारी इफको जळगाव यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने मेहनत घेतली.

Spread the love