सेवाभावे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री मा.श्री.विजयरावजी सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

0
15

तळोदा – :सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा यांच्या तर्फे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यातील सलसाडी व पांढुरका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम भारत माता, विद्येची देवी सरस्वती माता व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

https://youtu.be/DTsE-UzbH-s

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री मा.श्री.विजयरावजी सोनवणे स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजय मोरे व कांतीलाल पाडवी हे हे उपस्थित होते

या कार्यक्रमाचे प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे यांनी केली. यावेळी उपस्थित सेवाभावी प्रतिष्ठानचे संचालक अतुल पाटील, पाटील सर, पाडवी सर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार श्री पाटील सर यांनी केले.

Spread the love