प्रतिनिधी भरत कोळी
जळगाव -: निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर परिसरात कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन माहिती दिल्याने स्वतः पोलीसही याप्रकरणी चक्रावून गेले आहेत.
https://youtu.be/JApz6bM6_Uw
जितेंद्र संजय पाटील (वय २५) याने तीन वर्षांपूर्वी तमिता (वय २१) हिच्याशी प्रेम विवाह केला. तमिता हिचे माहेर शिवधाम मंदिर परिसरच आहे. जितेंद्र पाटील हा बांभोरी येथे राहतो. सध्या खूबचंद साहित्या अपार्टमेंट, निमखेडी शिवार या ठिकाणी राहण्यासाठी आला आहे आहे.
शनिवारी संध्याकाळी दोघे पती-पत्नी घरात असताना अचानक त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू झाले. यावेळी तमित्ताने पतीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेभान झालेल्या जितेंद्रने जवळच पडलेल्या वायरीने तामिताचा गळा आवळला. त्यातच तमिताचा मृत्यू झाला. त्यानंतर जितेंद्र पाटील स्वतःहून तालुका पोलीस स्टेशनला हजर झाला.
घटनास्थळी पोलिसांची धाव
पोलिसांनी जितेंद्रच्या घरी जाऊन याबाबत खात्री केली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना केला. पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.