जळगाव-: शहरातील फरार असलेला आरोपीचा शोध घेण्या बाबत मा. पोलीस अधीक्षक सो डॉ. श्री प्रविण मुंडे, मा. अपर पोलीस अधीक्षक साो श्री चंद्रकात गवळी, मा. सहा पोलीस अधीक्षक सो श्री कुमार चिंता यांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार मा. पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत की, जळगाव शहर पोस्टे सी. सी. टी. एन. एस. गुरनं 210/2022 भा.द.वि कलम 457,380 प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हयात सुमारे 4 महीन्यापासुन फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी फिरोज नूर मोहंमद शहा हा जळगांव रेल्वे स्टेशन मागील परीसरात आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यानी स्था.गु.शा कडील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना/नितीन बाविस्कर,अविनाश देवरे, ईश्वर पाटील अशांना सदर आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेश दिल्याने वरील पथकाने जळगाव रेल्वे स्टेशन मागील परीसरांत शोध घेतला असता तो रेल्वे स्टेशन मागील परीसरांत पुलाखाली मिळुन आल्याने आरोपी फिरोज नूर मोहंमद शहा वय 20 रा. गेंदालाल मील रूम न 22 बिल्डींग नंबर 23 जळगांव यांस ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता जळगांव शहर पोस्टे यांचे ताब्यात दिले आहे.