महेंद्र सोनवणे जळगाव-: शहरातील घरगुती व कमर्शील गॅसचे सिलेंडर वापरून अवैध रित्या वाहनाचे इंधन म्हणुन गॅस भरून देणा-या विरूध्द कारवाई करणे साठी मा. पोलीस अधीक्षक सो डॉ. श्री प्रविण मुंडे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री चंद्रकात गवळी, मा. सहा पोलीस अधीक्षक सो श्री कुमार चिंता यांनी केलेल्या मागदर्शन व सुचना नुसार मा. पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून एमआयडीसी पोस्टे हद्दीत जळगांव तोल काटा समोर रस्त्याच्या बाजुला सदर इसम हा अवैध रित्या घरगुती व कमर्शील गॅसचे सिलेंडर वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे साहीत्य कब्ज्यात बाळगुण आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी स्था गु शा जळगाव येथील पो हे कॉ जितेंद्र पाटील, महेश महाजन, पो नानितीन बाविस्कर, अविनाश देवरे, यांना कारावाईचे आदेश दिल्याने सदर पथकाने एमआयडीसी पो स्टे कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मदतीने बातमी मिळाल्या ठिकाणी छापा टाकुण आरोपी नामे इमरान शेख समद वय 38 रा. रथ चौक जळगाव यांस ताब्यात घेतले त्याचे कब्ज्यात घरगुती व कमर्शियल वापराचे एकुण 10 गॅस सिलेंडर तसेच वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे मोटार, पंप,इलेक्ट्रिक वजनकाटा साहीत्या असे एकुण 25,700/- रू कि.चे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचे विरूध्द एमआयडीसी पोस्टेला गुरनं 759/2022 भा.द.वि कलम 285 व Ec Act कलम (3) व (7) प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.