यावल तालुका प्रतिनिधी (दिपक नेवे)
■आदल्या दिवशी मंदिराचा गाभारा भरला
■तर दुसर्याच दिवशी पावसाची हजेरी
साकळीसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने पावसाअभावी संपुर्ण गावपरिसरात सर्वदूर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूणच संपूर्ण परिस्थिती शेतकऱ्यांत सर्वांसाठी चिंताजनक व संकटकालीन बनली आहे. या संकटातून संपूर्ण सजीवसृष्टीला बाहेर काढण्यासाठी व भरपूर पाऊस पडावा व संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम व्हावा या मागणीसाठी गावातील हनुमान पेठ भागातील जागृतअश्या ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी श्री महादेवाच्या मंदिराचा गाभारा पाण्याने तुडुंब भरून देवाला भरपूर पावसाठी साकडे टाकलेले आहे. दि . १६ रोजी हनुमान पेठ भागातील सर्व भाविक- भक्तांनी एकत्र येऊन श्री महादेवला पावसासाठी विनवणी करण्यासाठी मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरुवातीला देवाला यांच्या मनोज काशिनाथ बडगुजर हस्ते सपत्नीक महादेवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर एका सजवलेल्या बैलालाची नंदी म्हणून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.या नंदीचे घरोघरी मनोभावे पूजन करण्यात आले.यानंतर परिसरातील सर्व भाविक भक्त महिला-पुरुष, लहान मुले यांनी शक्य तेवढे आपल्या घरून पाणी आणून मंदिराचा संपूर्ण गाभारा पाण्याने भरला. यानंतर देवाची महाआरती करण्यात आली व पावसासाठी देवाला साकडे घातले.दरम्यान आदल्या दिवशी मंदिराचा गाभारा भरला व दुसऱ्याच दिवशी दि.१७ रोजी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. याअगोदरही जेव्हा- जेव्हा गावपरिसरातच पावसाने दडी मारलेली होती त्यावेळी या श्रीनिळकंठेश्वर महादेव मंदिराच्या गाभारा पाण्याने भरून देवाला साकडे टाकलेले आहे यानंतर वरुणराजाने हजेरी लावून सर्वांना सुखी केलेले असल्याचे अनुभवास आलेले आहेत त्यामुळे हे श्री महादेवाचे मंदिर जागृत व भावी भक्तांचे गाऱ्हाणे ऐकणारा देव असल्याची भक्तांची भावना आहे. त्यामुळे आता ही भरपूर पाऊस येऊन सर्व सजीव सृष्टी सुखी होईल अशी भक्तांची अपेक्षा आहे.