दिपक नेवे
यावल -भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्षपदी शरद बिऱ्हाडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडी संदर्भाचे पत्र तालुकाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिलेले आहे. शरद बिऱ्हाडे हे साकळी ग्रामपंचायतीचे सदस्य असून त्यांचा जनतेत उत्तम असा लोकसंपर्क आहे. निवडीबद्दल श्री. बिऱ्हाडे यांचे जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, यावल पंचायत समिती माजी उपसभापती दीपक अण्णा पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकासरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी यांचेसह संपूर्ण भाजपा तालुका कार्यकारणी ,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास नाना पाटील, सरपंच सौ.सुषमा पाटील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर,माजी ग्रा.पं.सदस्य राजू सोनवणे,नूतनराज बडगुजर, भाजपा कार्यकर्ते नाना भालेराव,विलास पवार,नितिन फन्नाटे यांचेसह गाव -परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केलेले आहे.