मुंबई-:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांत अयोध्येचे खासदार ब्रिजभूषण हे महाराष्ट्रात येणार आहेत, या काळात मनसेविरूद्ध ब्रिजभूषण असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
राज्यात येत्या २० ते २५ डिसेंबर या कालावधीत पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ब्रिजभूषण हे महाराष्ट्रात येणार आहेत. दरम्यान त्यांना कठोर भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता, त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला होता. आता ब्रिजभूषण हे महाराष्ट्रात येणार आहेत.राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. मागील काही वर्षात राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल माफी मागावी. अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेऊ देणार नाही असे आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिले होते. यानंतर राज ठाकरे यांना माघार घेत हा दौरा रद्द करावा लागाला होता.
राज ठाकरे यांनी तेव्हा प्रकृतीच्या कारण देत, तसेच कार्यकर्त्यांची सुरक्षा धोक्यात येईल असे सांगत तो दौरा रद्द केला होता. दरम्यान आता बृजभूषण सिंह हेत महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत कोणती भूमिका घेते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.