कोणी दम दिला तर घरात घुसून मारणार; बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणांचे प्रत्युत्तर

0
15

मुंबई-:आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मिटला असे वाटत असताना आता पुन्हा एकदा राना यांनी बच्चू कडू यांना इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी काल अमरावतीत झालेल्या सभेत बोलताना, “पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो”, असं विधान केलं होते. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर दोघांनी वादावर कालच पडदा टाकला होता. मात्र, आज, बुधवारी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. कडूंना कुठे गाठायचं ते मला माहित आहे, अशा इशारा आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे. मी कडूंना घरात घुसून मारू शकतो, असाही जोरदार इशारा रवी राणा यांनी कडू यांना दिला आहे.

दरम्यान, रवी राणा म्हणाले, ‘कुणी विनाकारण दम देऊन बोलत असेल, तर जशाच तसं उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मी मागे आलो. त्यांच्या मध्यस्थीमुळेच मी मागे शांत राहिलो. पण हा व्यक्ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान देत नाही. बच्चू कडू) हा विषय माझ्यासाठी छोटा आहे. कडूंना कुठे गाठायचं ते मला माहीत आहे’. ‘मी कडूंना घरात घुसून मारू शकतो, असाही जोरदार इशारा रवी राणा यांनी कडू यांना दिला आहे.

Spread the love