जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी केली अटक, नक्की प्रकरण काय?

0
41

विवियाना मॉलमधील धक्काबुक्की प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटातील काही दृश्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. आक्षेप घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपटगृहातील एका व्यक्तीशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती. चित्रपटाविरोधातील आंदोलन आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

Spread the love