विरावली गावात वार्ड क्रमांक 3 मध्ये गटारांचे काम होण्याबाबत निवेदन

0
40

दिपक नेवे

यावल -आज दिनांक 18-8-2021 रोजी विरावली गावात वार्ड क्रमांक 3 मध्ये गटारांचे काम होण्याबाबत निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विरावली ऍड देवकांत बाजीराव पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य शोभा युवराज पाटील हमिदा टेनु तडवी शकुंतला विजय पाटील यांनी दिले या निवेदनावर वार्ड क्र 3 च्या नागरिकांच्या त्या आहेत त्यात माजी ग्रा प सदस्य पवन युवराज पाटील माजी सदस्य रणधीर पाटील, माधव रमेश पाटील, प्रल्हाद गोकुळ पाटील दीपक भागवत पाटील ,प्रशांत गोपाळ पाटील , नामदेव मगन पाटील ,भूषण नानाजीराव पाटील ,बापू अजलसोंडे , यशवंत पाटील ,हिरालाल पाटील भूषण धनगर, विलास पाटील, धनराज पाटील ,गोकुळ पाटील ,चेतन पाटील,जिभु शिवाजी पाटील ,कैलास राजधर पाटील, नथू पाटील राजेश पाटील , राजेश अडकमोल, राहुल पाटील, देवेंद्र पाटील, संजय पाटील गुलाब पाटील, शरद पाटील, प्रकाश पाटील ,प्रदीप पाटील ,जितेंद्र धनगर अंबादास धनगर ,भीमसिंग पंडित पाटील आदींच्या सह्या आहेत या निवेदनात विरावली गावात वार्ड क्रमांक 3 मध्ये गटारींची स्थिती अत्यंत वाईट झाली असून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असून त्यावर रेंगाळणारे किडे घरात पोहोचत असून रोगराई निर्माण होऊन लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहेत सध्या covid-19 च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात थैमान घातली असून या सारख्या संसर्गजन्य आजारांवर वेळीच प्रतिबंध व्हावा म्हणून लवकरात लवकर गटारीचा प्रश्न मार्गी लावावा नाही तर वार्ड क्रमांक 3 चे नागरिक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतील , विरावली वार्ड क्रमांक 3 च्या नागरिकांची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज रोजी ग्रामसेवक यांना देण्यात आले.

Spread the love