रावेर-: ऐनपुर भगवती मंदिर येथे सर्व पक्षीय व इतर पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,सदस्य,समाज बांधवांच्या प्रमुख समस्यापैकी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र संदर्भात जळगाव जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक श्री.सोपानअप्पा सपकाळे व संजय कांडेलकर यांचे अनमोल मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावळे प्रमुख समाज सेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले अप्पांनी जातीचे दाखले काढतांना येणाऱ्या अडचणी व कागदपत्रे बाबत माहिती दिली व जिल्हा मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे यांनी जातीचे दाखले काढण्यासाठी कायदानुसार आपण लढाई देण्याची सुध्दा गरज आहे तसेच आम्ही सर्वतोपरी आपणास मदत करण्यास तयार आहोत. जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी यांनी तालुक्यात होऊ घातलेल्या निवडनूकीत समाज बांधवांनी एकत्रित येऊन जर कोणत्याही गावात,भागात ज्या ठिकाणी समाजाची संख्या असतांना इतर एक दोन घरे असणाऱ्या लोकांना जर उभे करीत असतील तर त्यांना समाजाने विरोध करावा मग तो कोणताही पक्ष किंवा व्यक्ती असो उदाहरणे बरेच आहे त्यापैकी फैजपूर येथील नगराध्यक्ष निवडणूक,मागील थोरगव्हाण जि.प.कोळी बहुसंख्य असतांना उमेदवार देणे. संजय कोळी यांनी मला चार पाच वर्षे जात प्रमाण पत्र काढण्यासाठी लागले तेही कोर्टातून काढले त्यावेळी मी आमदार साहेब समाजातील प्रमुख नेते यांच्या कडे सुध्दा गेलो पण कोणीही मदत केली नाही असे सांगितले. ईश्वर तायडे यांनी खरचं आजवर कोणत्याही पक्षाने किंवा नेत्यांनी आपला प्रश्न सोडविला नाही.म्हणुन आपली लढाई आपणचं लढली पाहिजे त्याकरिता आपण एकमेकांना मदत केली पाहिजे.नितीन कोळी यांनी समाजातील ज्या व्यक्ती कडे जातीचे दाखले आहेत त्यांनी इतरांना मदत व सहकार्य करावे तसेच सुशिक्षित तरूणानी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आज इतका जिव्हाळा चा विषय असतांना समाजातील फक्त 50/60 व्यक्ती हजर आहे एक खंत व शोकांतिका आहे.फक्त गटतट,समाज कार्याचा देखावा व कांगावा करायचा हे काम करत राहिले तर आपण आपले पाय ओढल्या सारखे आहे.संजय कांडेलकर यांनी आपण आदी 36/36 नोदण करणे आवश्यक आहे जर काही अडचणी आल्यास आपण सर्व मिळवून सोडविण्यासाठी तत्पर असु अध्यक्षीय मनोगतातून जिल्हाध्यक्ष सुभाष सपकाळे यांनी आदिवासी कोळी महासंघ कोणत्याही कामात नेहमी अग्रेसर असेल व सर्वतोपरी आंदोलन,मोर्चे उपोषण तसेच मदत करेल तसेच मा. डॉ.भांडे साहेब त्यासाठी नेहमी आंदोलनाच्या माध्यमातून समाजकार्य करीत आहे व त्यांना यश सुध्दा येत आहे ज्या ज्या वेळी कोणतेही काम आंदोलने करण्यासाठी वेळ येईल त्यावेळी मा. मंत्री डॉ.भांडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल.तसेच कोळी समाज तालुका अध्यक्ष बंडू कोळी यांनी राजीनामा दिला असून नवीन तालुका अध्यक्ष आज चर्चानुसार पुढच्या मिटींग मध्ये निवडला जाईल तरी सर्व समाज बांधवांनी त्यावेळेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले. त्यावेळी जिल्हा सदस्य विनोद कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी,तालुका अध्यक्ष मनोहर कोळी, युवक तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोळी,ता.सरचिटणीस तथा सरपंच सुपडु मोरे,सरपंच नितीन सपकाळे कोळी,महिला अध्यक्ष सविता कोळी,सचिव ईश्वर कोळी,जयराम कोळी,किशोर कोळी,पृथ्वी जैतकर, राजेंन्द्र महाले,बंटी कोळी,योगेश्वर कोळी,रवी सोनवणे,विनोद कोळी, आनंदा कोळी,मोहन कोळी,संदीप महाले,राहुल कोळी, रविंद्र ठाकरे,नरेद्र जैतकर,गोकुळ कोळी, भगवान कोळी,विनोद कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मनोहर कोळी यांनी केले व आभार युवा अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांनी मानले.