साकळी येथील श्री वाडेश्वर महादेव मंदिरात शिवपुराण वाचन..

0
14

दिपक नेवे

साकळी येथील मनवेल रोडवरील श्री वाडेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त शिवपुराण वाचनाचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारी पासून मुक्त करण्यासाठी तसेच

तळई येथे दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मोठी जीवितहानी झाली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले तसेच कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊन महापुराचे संकट आले या महापुराच्या संकटात सुद्धा अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तरी यापुढे अश्या वेगवेगळ्या अशा संकटातून मानवजातीची सुटका व्हावी तसेच साकळीसह परिसरात पावसाने दमदारपणे हजेरी लावून सर्वत्र सुख-समृद्धी व्हावी या संकल्पित मागणीसाठी श्रावण मासानिमित्त या मंदिरात शिवपुरान वाचनाचा विधिवत कार्यक्रम सुरू आहे. शिवपुराणणाचे वाचन साकळी येथील रामकृष्ण खेवलकर हे करीत आहे. शिवपुराणाचे दररोज सकाळी वाचन होत असते.

यावेळी अनेक भावीक- भक्त उपस्थित असतात. शिवपुराण वाचन धार्मिक कार्यक्रमासाठी सुनील बडगुजर,योगेश (आप्पा ) खेवलकर, राजेंद्र नेवे,यतीन नेवे, रितेश नेवे, प्रताप आप्पा बडगुजर भाऊलाल बाविस्कर, रवींद्र बडगुजर (मिस्तरी),जयदीप बडगुजर यांचेसह सर्व भावी- भक्तांचे सहकार्य मिळत आहे.

Spread the love