जळगाव- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष निलेश अजमैरा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या उपस्थित जळगाव महानगर मनसेचे अध्यक्ष निलेश अजमैरा यांच्यासह २० कार्यकर्त्यांनी दादावाडी मंडल क्र.५ येथे समर्थ बुथ अभियानाप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी निलेश अजमैरा यांनी सांगितले की, आम्ही जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन प्रवेश केला आहे. पक्ष वाढविण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू व जी जबाबदारी आम्हाला दिली जाईल त्याचे पालन करू. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, मंडल अध्यक्ष शक्ति महाजन उपस्थित होते. अजमैरा यांच्या भाजपा प्रवेशाने जळगाव शहरासह अनेक ठिकाणी राजकिय चर्चा होत आहे .