हेमकांत गायकवाड
चोपडा: धरणगाव /अमळनेर रस्त्यालगत असलेल्या पंकज ग्लोबल शाळेपासून ते निमगव्हान रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे.मागील एका वर्षापासुन हा रस्ता आहे की नाही हे मात्र लक्षात येणे अवघड झाले आहे.रस्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता आहे हे मात्र नागरिकाच्या लक्षात मात्र येईना.या रस्त्याच्या कामावरून दिसुन येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पावसाळ्याला सुरवात होताच रस्त्याची सत्यता व निकृष्ठता व संपुर्ण १५ किलोमीटर पर्यंत जागोजागी खड्याचे साम्राज्य समोर आले आहे, यामुळे परीसरातील शेतकरी, मोटरसायकल,बस, अवजड वाहन,इ वाहन चालवणारे नागरिक यांची संबधित विभागावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुढे काय होणार सदरील रस्त्याची झालेली अवस्था.मात्र हे सर्व होत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिले आहे का ? ओरड शेतकरी वर्गाकडून केली जात आहे याकडे संबधित विभाग लक्ष देईका का? असे अनेक प्रश्न परीसरातील शेतकरी , व रस्त्यावरुन जाणारे नागरिक याच्या कडुन नाराजी व्यक्त होत आहे.