जळगाव-: रामानंदनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटयांनी तक्रारदार हिच्या हातातील मोबाईल सेल फोन हिसकावून जबरदस्तीने पळवून नेला होता. त्याबाबत वरप्रमाणे दिनांक १९/०९/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा कॉलेज परिसरात घडल्याने मा पोलीस अधीक्षक सो श्री एम. राज कुमार व मा.अपर पोलीस अधीक्षक सो श्री चद्रकांत गवळी यानी गुन्हयातील अज्ञात जबरीचोरी करणार्या आरोपीचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन करुन मा पो. नि. श्री किसन नजन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे पो.नि श्री किसन नजनपाटील यांनी पोलीस हवालदार विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार जितेंद्र पाटील, मोहर अकरम शेख, पोह सुधाकर अंभोरे,पोलीस हवालदार संदीप साबळे, पोलीस नायक विजय पाटील, पोलीस नायक अविनाश देवरे,पोलीस नायक नितीन बाविस्कर,पोलीस नायक प्रितम पाटील, पोकी/सचिन महाजन, पोलीस नायक किरण धनगर यांचे पथक तयार करून अज्ञात चोराचा शोध घेणे बाबत सूचना देवून तपास पथक रवाना केले होते,
मा पो नि श्री किसन नजन पाटील यांच्या गोपनिय माहीती वरून पथकातील घरनमुद पोलीस अंमलदार यांनी अज्ञात जबरीचोरी करणाऱ्या चोरटयाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवन त्याचे नांव विचारता त्याने त्याचे नांव १) विशाल दिनकर सपकाळ वय २३ राह शास्त्रीनगर जामनेर, २) आकाश कडु आल्हाट वय २२ रा. शिवाजीनगर जामनेर, यांना ताब्यात घेवून त्यांना अधिक विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार नाम ३) योगेश सोनार रा. जामनेर याच्यासह सदराचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गुन्हयातील आरोपांना रिपोटांसह गुन्हयाचे पुढील तपासकामी रामानंदनगर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.









