नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात निषेध मोर्चा !!!

0
15

वीरेंद्र मंडोरा

जळगाव – नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना चिपळून मधून नाशिक पोलिसांनी अटक केली आहे .

त्याचे पडसाद आज जळगावात पहावयास मिळाले आज सकाळी शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयात जाऊन सामानाची तोडफोड करून व तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्याबद्दल शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे परंतु फिर्याद घ्यायला पोलिसांनी आनाकानी केल्याच्या निषेधार्थ भाजप च्या कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी बीजेपी कार्यालया पासून महानगरपालिकेत पर्यंत व तिथून परत टॉवर चौकापर्यंत मोर्चा काढला होता . त्यात नगरसेवक डॉक्टर विरल खडके . दीपक सूर्यवंशी . राजू मराठे . व अनेक महिला कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी डी वाय एसपी कुमार चिंथा शहर पोलिस स्टेशनचे पीआय व डी बी चे कर्मचारी व शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त राखला होता .

 

https://youtu.be/Ej3HbbcBf7U

Spread the love