ममुराबाद पीक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी भरत शिंदे तर व्हा.चेअरमन पदी सुकदेव सावकारे याची निवड.

0
22

ममुराबाद-: ता. जळगाव येथील पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन ची निवड आज दिनांक १३ रोजी निबंधक कार्यालयाचे श्री मनोज भारंबे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमनपदी भरत शिंदे यांची व व्हा चेअरमनपदी सुकदेव सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिक सरंक्षण सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी संस्थेच्या कार्यालयात सहाययक निबंधक कार्यालयाचे श्री मनोज भारंबे यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी संस्थेचे माजी चेअरमन डॉ उल्हास कोलते, बाळकृष्ण पाटील व सर्व संचालकांच्या संमतीने चेअरमनपदासाठी भरत प्रताप शिंदे व व्हा चेअरमन पदासाठी सुकदेव सेनु सावकारे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याने त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भारंबे यांनी घोषित केले.

सादर निवड प्रसंगी संचालक डॉ उल्हास कोलते, बन्सी पाटील, राहुल ढाके, मधुकर चौधरी, दशरथ जावळे, राजेंद्र पाटील, अमर पाटील,प्रभाकर ढाके, भालचंद्र ढाके, ग्रा, पं. सदस्य शैलेंद्र पाटील, सचिव किशोर चौधरी, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. निवड होताच त्यांचा सत्कार बन्सी पाटील, अमर पाटील, यांच्या हस्ते करण्यात आला.

Spread the love