हिंदी आम्हाला आवडे आणि मराठीचे वावडे, राष्ट्रवादीचा ईडी सरकारला टोला

0
11

राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याबाबतचे एक पत्रक राज्य सरकारकडून जारी करण्यात आले असून त्यात हिंदीला राष्ट्रभाषा म्हटले असून त्या भाषेच्या उन्नतीसाठी व उत्तेजनासाठी य़ा अकादमीची स्थापना केल्याचे म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात आली आहे.

”हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा महान शोध लावणारे धन्य ते शिंदे-फडणवीस सरकार. हे म्हणजे हिंदी आम्हाला आवडे आणि मराठीचे वावडे” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांनी ”हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करणारे महाराष्ट्र सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार का?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Spread the love