सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम.के.पाटील सर यांना उपक्रमशील पुरस्कार देण्यात आला.

0
40

दिपक नेवे

यावल नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम के पाटील सर यांना काल शिक्षक भारती तर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला . सदरील पुरस्कार शिक्षक भारती संघटनेचे आमदार माननीय कपिल पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे कांतीबाई हॉल या ठिकाणी समारंभात देण्यात आला. सदरील पुरस्कार वितरण सोहळा काल पाच वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यालयातील पदाधिकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले जात आहे. सन्माननीय व्यवस्थापक मंडळाने सुद्धा सरांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. एम के पाटील सर हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नेहमीच कार्यतत्पर असतात शिवाय आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी सानेगुरुजी या शाळेचा कायापालट करायचा ध्यास बांधला असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असून . त्यांना त्यात सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन यश मिळत आहे. एम के पाटील सर हे मूळ विरवली गावातील रहिवासी असून त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल विरावली गावासह सर्व परिसरातून त्यांचे अभिनंदन देत आहे यात शहरासह तालुक्यातील सर्वच सामाजिक , राजकीय , क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे .

Spread the love