साकेगाव शिवारात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

0
37

भुसावळ ( प्रतिनिधी ) – साकेगाव – भुसावळ रस्त्यावर जय जवान पेट्रोल पंप जवळच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर क्र एम एच १९ झेड ८८८० या वाहनावर तहसीलदार भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी योगीता पाटील , साकेगाव तलाठी कुंभार , सुनसगाव तलाठी जयश्री पाटील , कोतवाल जितेश चौधरी यांनी कारवाई करीत डंपर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले असता चालकाने हे डंपर पळवत रेती खाली केली हा प्रकार लक्षात येताच सर्कल अधिकारी व तलाठी यांनी रेतीचा पंचनामा केला आहे.हे डंपर साकेगाव येथील जीवन पुंडलिक पाटील यांच्या मालकीचे असल्याचे समजते.

Spread the love