ममुराबाद येथे विर मुंजाच्या मंदिरातील मुर्तिची चोरी,,,, दगळाच्या मुर्ति चोरीची पाहिलीच घटना.

0
39

ममुराबाद -: ममुराबाद येथील खंडेराव मदिराच्या पटांगणामध्ये बांधण्यात आलेल्या विर मुंजाच्या मंदिरातील मुर्तिची चोरी .

याबाबत सविस्तर माहिती अशी कि गावी असलेल्या खंडेराव मंदिराच्या पायथ्याशी विर मुंजाचे मंदिरे बांधुण तेथे विर आणी मुंजांची विधीवत स्थापना करण्यात आली आहे.

आजपर्यंत असे अनेक प्रकार आपण सिनेमांमध्ये पाहिले आहेत. परंतु दगळाची मुर्ती चोरीची घटना पाहिल्यांनदाच ममुराबाद मध्ये घडली आहे.

डिसेंबर 2022 मध्ये गावी संजु विरची स्थापना करण्यात आली. स्थापना करते वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहुन भगत बोलावण्यात आले. तीन ते चार दिवस स्थापनेचा कार्यक्रम सुरु होता. दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी गावात मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली. स्थापणे वेळी खंडेराव मंदिरावर भंडार्‍याचा कार्यक्रम देखील करण्यात आली.

आणी आज शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास कैलास कोळी सकाळी दिवा लावण्यासाठी मंदिरावर गेले असता मुर्ति चोरी झाल्याचा प्रकार त्यांचे लक्षात आल्यावर गावातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

दगळाच्या मुर्तीची चोरीची घटनेमुळे नागरीकांनमध्ये तर्क विर्तक लढविले जात आहे.

Spread the love