महिलांना शुभेच्छा देऊन हरिपाठाच्या दुसऱ्या महिन्याचा पहिला दिवस हरीनामाने साजरा…! 

0
41

हेमकांत गायकवाड

चोपडा: श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथे चातुर मासानिमित्त हरिपाठाचा दुसऱ्या महिन्याचा पहिला दिवस, दिनांक 26 ऑगस्ट 20 21 रोजी महिला समानता दिवस साजरा करून ,महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश तेली महासंघ संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर व त्यांच्या धर्मपत्नी सौ सरलाबाई कालिदास चौधरी यांचे शुभहस्ते आरती करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज मूर्तीचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून संताजी महाराजांचा जयघोष करण्यात आला .यावेळी ह-भ-प गोपीचंद महाराज, ह भ प तेजस महाराज, ह भ प चेतन महाराज ,बालगोपाळ मंडळी आदी मन्डऴी उपस्थित होती.

Spread the love