सुनसगाव येथे श्री महाशिव पुराण कथेला सुरुवात.

0
37

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथील अंजनातील महादेव मंदिरात दि. १२ पासून दुपारी १ ते ५ या वेळेत श्री शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून वाचक हभप मयुर महाराज ममुराबादकर यांच्या सुमधुर वाणीतून कथा श्रवण करण्यात येत आहे . ही कथा सप्ताहाचे आयोजन जय भोले गृप ने केलेले असून सांगता दि १८ रोजी होणार भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.

या सप्ताहात महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या असून परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक जय भोले गृप यांनी केले आहे.

Spread the love