चोपडा (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीक्षेत्र, पंढरपूरचे श्रीविठ्ठल- रुख्माईच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी पालखी दिंडी पताका घेऊन तसेच वाहनांद्वारे सुमारे दहा बारा पंधरा लाखांपेक्षाही जास्त भाविकभक्तं येत असतात. नियोजनबद्ध पद्धतीने श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन तुळशीची माळ गळ्यात घालून सुखरूप घरी पोहोचत असतात. त्याच पद्धतीने सिहोरचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेला सुद्धा लाखोंचा जनसमुदाय जमत असतो. पं. मिश्रांच्या ज्या ज्या ठिकाणी कथा होतात त्याच ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला रुद्राक्षाचे वाटप केले पाहिजे. कारण सध्याची सिहोरची परिस्थिती बघता भाविकभक्तांनी कुठलाच विचार न करता पं. प्रदिप मिश्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रुद्राक्ष घेण्यासाठी घरदार सोडून सिहोरला जाऊन हालअपेष्टा करून घेतलेल्या आहेत. अलोट गर्दीमुळे तेथील नियोजन पुर्ण कोलमडलेले आहे. शासन प्रशासन हतबल झालेले आहे. हज्जारों लोकं अन्नपाण्यावाचून जागेवरच ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेले आहेत. रुद्राक्षांचे वाटपही बंद झालेले आहे. तेथे गेलेल्या भाविकभक्तांसाठी “इकडे आड- तिकडे विहीर” अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना तेथेच चेंगराचेंगरीत तर काहींना रस्ते अपघातात जीव गमवावा लागत आहे. हज्जारों लोकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
धर्मरक्षक पं.प्रदिप मिश्रांचा शब्द प्रमाण मानून भाविकभक्तं पूजाअर्चना करीत आहेत. त्यांची ज्या ठिकाणी कथा असते त्याच ठिकाणी त्यांनी रुद्राक्षांचे वितरण केले पाहिजे, अशी समयसूचक प्रतिक्रिया चोपडा येथील अध्यात्मिक धार्मिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर (मौनव्रतधारी- गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये दिलेली आहे.
घरीच देवासमान माय बापाची सेवा केली पाहिजे..
जळी स्थळी काष्ठी पाषाणी, इतरत्र सर्वत्र देवाचं अस्तित्व आहे. कलियुगात कर्मकांडापेक्षा ज्ञानकांडाला महत्व आहे. नरदेहातील आत्मारूपी ईश्वराचे नामस्मरण करणे, घर एक मंदिरातील देवता समान आई वडिलांची सेवा करणे, मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून संसार प्रपंच करून परमार्थ साधणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे..
जगन्नाथ बाविस्कर (संपर्कप्रमुख),म.वाल्मिकी समाज मंडळ ता.चोपडा.