तळोदा – :दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी सालाबादप्रमाणे सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे बोरवान येथे देवमोगरा मातेच्या यात्रेनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. देवमोगरा मातेचा यात्रोत्सव जोरात सुरुवात झाली आहे. सेवाभावे प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील हजारो भाविक या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी भाविकांनी प्रसादाच्या लाभ घेतला.
या महाप्रसादासाठी अनमोल सहकार्य श्री. योगेश यशवंत चौधरी, श्री. राजन रतिलाल पाडवी, श्री. सुभाष मारुतीराव चौधरी, श्री. भरतजी राजपूत, श्री. अमित सक्सेना, श्री. नितीन सुरूपसिंग ठाकरे यांनी केले.
यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या विजयसा सोनवणे, देवमोगरा माता बोरवान येथील पुजारी बिजऱ्या महाराज, विमलगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सारंगजी माळी, रुद्र मेडिकल चे संचालक श्री. सौरभ माळी, सुनील मोरे, बोरवान गावाचे पोलीस पाटील कृष्णा भाऊ ठाकरे, अमरसिंग दादा ठाकरे, मैकू शेठ सक्सेना, राज पाटील, नकुल ठाकरे, रतिलाल ठाकरे, मुकुंद मोरे, सायसिंग ठाकरे, शिवदास ठाकरे, ईश्वर ठाकरे, शांतीलाल ठाकरे, किशोर राजा पाडवी हे भंडाऱ्याच्या ठिकाणी उपस्थित होते.
या भंडाऱ्याचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानच्या ग्राम समिती बोरवान, ग्राम समिती टाकली, ग्राम समिती खर्डी, ग्राम समिती बंधारा, ग्राम समिती रावलापाणी, ग्राम समिती गायमुखी, ग्राम समिती मोकसमाळ येथील प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले होते.