आता पुस्तकांमध्येच लिहिण्याची सोय! विद्यार्थ्यांची होणार वह्यांपासून सुटका

0
38

मुंबई – आता पुस्तकांमध्येच वह्यांची पान देण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं घेतला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीच्या पुस्तकांमध्ये हा बदल केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे.

त्यामुळं विद्यार्थ्यांची आता वह्या वापरण्याची गरजच पडणार नाही.

या नव्या निर्णयानुसार, आता तिसरी ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं चार भागात विभागली जाणार आहेत. प्रत्येक धड्यामागे आणि प्रत्येक कवितेमागं एक वहीचं पान असणार आहे. यामध्ये विद्यार्थी धडा शिकत असतानाच काही नोट्स घेऊ शकणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील तेव्हा त्यांच्या दप्तरात वह्या आणण्याची गरज पडणार नाही. केवळ हे पुस्तकचं घेऊन त्यांना येता येईल. पुढील वर्ष २०२३ ते २०२४ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

Spread the love