चोपड्यात १२ मार्चला कोळी समाजाचा वधू-वर व पालक परिचय महामेळावा..

0
13

चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील आदिवासी टोकरेकोळी जमातीचा वधू- वर सूचक व पालक परिचय महामेळावा (प्रथमवर्ष) दि.१२ मार्च २०२३ (वार रविवार) रोजी दुपारी २:३० वाजता महर्षी वाल्मिकी समाज मंदिर, गोरगावले रोड, चोपडा येथे घेण्यात येणार आहे. ह्या मेळाव्याचे आयोजन समस्त कोळी समाज पंच मंडळ विटनेर व श्री एकविरा कृषी सेवा केंद्र चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. त्याप्रसंगी म.वाल्मिकी ऋषी प्रतिमा पुजन व समाजमहर्षी स्व. सितारामबापू देवराज (गलंगी) यांच्या तैलचित्राचे अनावरण जयगुरुदेव संगतचे ज्येष्ठवक्ते परमपूज्य भबुतअण्णा महाराज (खर्देकर) यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. प्रार्थनागायन खंडु महाराज (कोळंबा) हे करणार आहेत. मेळाव्याला कोळी समाजाचे सर्वश्री ज्येष्ठश्रेष्ठ नेतेमंडळी, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, कार्यकर्ते, माताभगिनीं यांचीही उपस्थिती लाभणार आहे. तसेच म.वाल्मिकी ग्रुप तरूण मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभणार आहे. याप्रसंगी विवाह योग्य वर-वधू , उपवर-वधु, घटस्फोटीत, विधवा, विधुर वरवधु यांनी आपल्या पालकांसह उपस्थित रहावे, असे आवाहन मेळाव्याचे स्वागताध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये केले आहे.

चोपडा तालुका शहर व ग्रामीण भागातील गाववॉईज वधू-वर नोंदणी संपर्कप्रमुख सेवाधिकारी मंडळ पुढीलप्रमाणे- लखिचंद बाविस्कर, प्रल्हाद ठाकरे, मोतीलाल रायसिंग, भगवान बाविस्कर, मुरलीधर बाविस्कर, मधुसूदन बाविस्कर, गोपीचंद बाविस्कर, भरत पाटील, नवल देवराज, गव्हरलाल बाविस्कर, सागरकुमार साळुंखे, वैभवराज बाविस्कर (चोपडा), योगेश बाविस्कर गोरगावले बुद्रुक, हिम्मत ठाकरे गोरगावले खुर्द, वाल्मीक कोळी खेडीभोकरी, सुकलाल कोळी मंगरूळ, मुरलीधर कोळी वटार, विजय बाविस्कर सुटकार, कडूजी कोळी वडगाव बुद्रुक, गोपीचंद कोळी अडावद, रामचंद्र कोळी रूखणखेडे प्र.अ., अरुण साळुंखे कमळगाव, वकिल इंगळे पिंप्री, विनोद कोळी मितावली, किशोर बाविस्कर पुनगाव, सुरेश कोळी देवगाव, विशाल कोळी पारगाव, जितू कोळी शांताराम कोळी धानोरा, भालेराव कोळी बिडगाव, प्रविण कोळी पंचक, अभिषेक कोळी लोणी, चंद्रकांत कोळी खर्डी, डॉ. रविंद्र कोळी वर्डी, पुंडलिक कोळी वडती, संजय सोनवणे विष्णापूर, राजेंद्र बाविस्कर आडगाव, अर्जुन कोळीसर विरवाडे, पंकज साळुंखे बोरअजंटी, युवराज कोळी वैजापूर, समाधान साळुंखे नागलवाडी, बाळू कोळी वराड, प्रशांत सोनवणे चुंचाळे, सुभाष कोळी मामलदे, राजेंद्र कोळी कृष्णापूर, संदीप कोळी चौगाव, कैलास बाविस्कर लासुर, दिलीप कोळी सत्रासेन, दिपक कोळी गणपुर, मंगल कोळी भवाळे, मच्छिंद्र कोळी चंद्रकांत बाविस्कर गलंगी, संजय कोळी वेळोदे, दिलीप शिरसाठ घोडगाव, धनराज कोळी कुसुंबा, किशोर कोळी सुभाष कोळी भाऊलाल कोळी विटनेर, गोपाल कोळी किशोर कोळी वढोदा, भिका कोळी अजंतीसिम, भुरा कोळी अनवर्देअनेर, कैलास कोळी मोहीदे, नरहर कोळी सुरेश कोळी दगडी, भरत कोळी वाळकी, गजानन कोळी अनवर्देतापी,पंडित शिरसाठ बुधगाव, नाना अहिरे हातेड खुर्द, प्रकाश बाविस्कर हातेड बु., नवल कोळी धुपेखुर्द, अंकुश कोळी विचखेडे, विकास कोळी घाडवेल, लक्ष्मण कोळी अकुलखेडे, तुळशीराम कोळी चहार्डी, शिवाजी कोळी वेले, महेंद्र कोळी मजरेहोळ, धनराज बाविस्कर निमगव्हाण, चंद्रकांत रायसिंग तांदलवाडी, गजानन कोळी दोंदवाडे, अमोल कोळी खाचणे, विलास कोळी तावसे बुद्रुक, प्रकाश कोळी कुरवेल, प्रकाश कोळी सनपुले, गुलाब कोळी कठोरा, अनिल कोळी कोळंबा, दीपक कोळी वडगावसिम, साहेबराव कोळी घुमावलखुर्द, रवींद्र कोळी माचला, समाधान कोळी तावसे खुर्द आदींकडे तसेच श्री एकविरा क्रुषि सेवा केंद्र दु.नं.२ बापुजी कॉम्प्लेक्स् चोपडा येथे वधु-वर सुचक नि:शुल्क नावनोंदणीचे फॉर्म उपलब्ध राहतील,अशीही माहिती चोपडा तालुका म.वाल्मिकी समाज मंडळाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली आहे.

Spread the love