सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले.

0
31

सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले.
दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खर्डी गावामध्ये सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे भव्य आरोग्य शिबिर करण्यात आला. यावेळी देवमोगरा माता व भारत माता यांचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ. सारंग जी माळी,सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.उमेश भैय्या सोनवणे, खर्डीचे श्री.सुनील मदन मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नकुल दित्या ठाकरे यांनी केले
या कार्यक्रमात रुद्र मेडिकलचे मालक सौरभ माळी व प्रिन्स मेडिकलचे मालक नितीन मगरे, खर्डी ग्रामपंचायतचे सदस्य मुकुंदा मोरे, अमित पाटील,सुरपसिंग ठाकरे, चंभूलाल ठाकरे,किशोर पाडवी व गावातले ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ.सारंग माळी म्हणाले की, सेवाभावे प्रतिष्ठानचे काम मी मागील तीन वर्षापासून बघत आहे. त्यांनी केलेले समाजकार्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपणही आरोग्य शिबिर घ्यावे का? मला उमेश भैय्या यांनी एका मिनिटात होकार दिला व आम्ही आज तळोदा तालुक्यातील अतिदुर्ग खर्डी या गावात हा व असे आरोग्य शिबिर नियमित घेत राहू.
या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर पाटील कार्याध्यक्ष संतोष चौधरी, नकुल ठाकरे,अनिल नाईक ,अतुल पाटील यांनी केले.

Spread the love