बेलव्हाळ येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या .

0
10

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथील एका ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या बाबत तालुका पोलीस ठाण्यात बेलव्हाळ पोलीस पाटील निलेश आंबिकार यांनी खबर दिली की दि.७ जानेवारी रोजी सकाळी ७:१५ वाजता गावातील योगेश विनायक खाचणे यांनी फोन करून सांगीतले की आपल्या गावातील रहिवासी संतोष पुना नेहते ( वय ३५ ) याने गावा लगत सुनसगाव रस्त्यावर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतला आहे अशी माहिती दिली. त्यानंतर सदर इसमाला भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.या बाबत माहिती मिळताच गावातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . मयत संतोष नेहेते हा अविवाहीत होता.त्याला सतत कान दुखण्याचा त्रास होता .असे गावातील ग्रामस्थांकडून समजते.याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस अ.मृ.क्र.०१/२०२६ बीएनएसएस १९४ प्रमाणे दाखल करण्यात आले असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा फानाचे औट पोष्ट चे पोऊनि संजय कंखरे तपास करीत आहेत. वास्तविक पाहता हा युवक आत्महत्या करुच शकत नाही असे काही लोकांचे म्हणणे असून या युवकाला कोणी धमकी तर दिली नाही ना ? असा सवाल अनेकांच्या मनात असला तरी नेमके कारण लवकरच समोर येईल असे पोऊनि संजय कंखरे व पोलीस कर्मचारी विकास बाविस्कर, सचिन पारधी,सुभाष सोनवणेव इतरांनी सांगीतले आहे.

Spread the love