‘आता ते म्हणतील हनुमान, चंद्रावर सर्वात आधी गेला होता’, स्टॅलिनची बहीण कनिमोझी यांच्या वक्तव्याने देशभरात संताप

0
26

दक्षिण भारतातील नेत्यांमध्ये सनातन धर्म, देवी-देवतांवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. तामिळनाडूत निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. यापूर्वी स्टॅलिन यांच्या मुलाने सनातन धर्म संपवण्याचे विधान केले होते.तर आता त्यांची बहीण कनिमोई करुणानिधी यांनी पुन्हा सनातन धर्माला लक्ष्य केले. मुदराई येथे एका सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. “एक चांगली गोष्ट आहे की, तामिळनाडूमध्ये असा राजकीय नेता नाही, जो म्हणेल की, चंद्रावर सर्वात आधी हनुमान गेला होता. ते असं पण म्हणतील की त्यांची आजी पण चंद्रावर गेली होती आणि ती अद्याप तिथेच थांबलेली आहे.” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावरून एकच संताप उसळला आहे.

तामिळनाडूतील मुलांना जर तुम्ही प्रश्न केला की, चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले तर तो खरं आणि योग्य उत्तर देईल. तो म्हणेल नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते. पण तुम्ही उत्तर भारतातील नेत्यांना विचाराल तर ते म्हणतील हनुमानानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यांनी यावेळी सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेतील अनेक नेते देवी-देवतांवर वारंवार टीका करून आपण पेरियरचे खरे शिष्य असल्याचे दाखवण्याचा, भासवण्याचा वारंवार प्रयत्न करतात. त्याचाच हा भाग असल्याचे दिसून येते.

सनातन धर्माला विरोध हे राजकारण

डीएमके आणि या पक्षाचे नेते अनेक वर्षांपासून द्रविड आंदोलनाआडून सनातन धर्मावर वारंवार टीका करताना दिसतात. कधी रामायणाच्या पात्रावर ते शंका उपस्थित करतात. तर कधी देवी-देवतांवर खालच्या पातळीवरील टीका करतात.आता कनिमोई यांनी हनुमानावरून वाद तयार केला आहे. आक्रमणकर्त्यांनी प्रयत्न करूनही द्रविड संस्कृती टिकून राहिली. द्रविड आंदोलन हा त्याचाच भाग आहे. वोट बँकसाठी कनिमोई यांनी असं विधान केल्याचा दावा करण्यात येत आहे.

कनिमोईच्या वक्तव्याने संतापाची लाट

कनिमोईच्या वक्तव्याने देशभरात संतापाची लाट उसळली. समाज माध्यमांवर त्यांच्यावर जनतेचा राग फुटला. अनेक विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. इतर धर्माविषयी आणि इतर धर्माच्या प्रथांविषयी असं बोलण्याची कनिमोई यांनी हिम्मत दाखवावी असे आव्हान अनेक युझर्स आणि विरोधकांनी त्यांना दिले. सनातन धर्माला टार्गेट करण्याचे हे नवीन फॅड असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

Spread the love