प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – तालुक्याचे लोकप्रिय आदरणीय आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त श्री सुनिलभाऊ कोंडे यांच्या व सनराईज व्हिजन फाउंडेशन,निंभोरा यांच्या वतीने तरुणांसाठी “रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला होता .यावेळी चेतना इन्स्टिट्यूटचे संचालक श्री धनंजयभाऊ चौधरी,श्री प्रल्हादभाऊ बोंडे,डॉ श्री एस डी चौधरी, माजी सरपंच श्री डिगंबर चौधरी,नाशिक स्थित टी.डी.के. इंडिया लि. चे अधिकारी श्री मनोज पाटील,श्री वैभव आखरे,धवल प्लेसमेंट,नाशिकचे श्री रवींद्र ब-हाटे,खिरोद्याचे श्री हर्षल बोरोले,श्री गुणवंत भंगाळे,श्री राजीव भोगे,श्री गिरीश नेहेते,श्री रवींद्र भोगे,श्री विवेक बोंडे,श्री अतुल पाटील,श्री हर्षल ठाकरे,श्री राज खाटीक श्री किरण कोंडे यांसह मेळाव्यासाठी परिसरातील अनेक युवा तरुण या कार्यक्रमास उपस्थित होते.त्यातील ६० तरुणांना आज जागेवर नियुक्तीपत्र (joining letter)देण्यात आल्याने तरुणांनी आनंद व्यक्त केला.












