प्रतिनिधी – जितेंद्र काटे
प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील नविन ६६० मेगावँट प्लाँट मध्ये दि.६ आँक्टोबर रोजी सकाळी गँस कटींग चे काम सुरू असताना मोठा स्पोट झाला त्यात दोन कामगार जखमी झाले असून त्यात एक परप्रांतीय अमितकुमार व फुलगाव येथील दिपक बाविस्कर हे गंभीर जखमी झाल्याचे समजते. दोन्ही जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. या प्रकारामुळे मात्र दिपनगर च्या नविन प्लाँट मधील कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.